२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण जगात करोना विषाणूचा उद्रेक झाला आणि जगाबरोबरच आपल्या देशातसुद्धा जानेवारी, फेब्रुवारी २०२० दरम्यान त्याची चाहूल लागू लागली. यापूर्वीसुद्धा जगात आणि आपल्या देशातसुद्धा महाभयंकर साथींचा उद्भव झाला होता आणि त्या त्या वेळी त्या रोगांमुळे अपरिमित मनुष्यहानीही झाली होतीच. पण त्या काळात त्या साथींचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण विश्वात कधीही झालेला नव्हता. पण आता हा करोनाचा उद्रेक एकाच वेळी संपूर्ण जगात झाला आणि अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे संपूर्ण विश्वात हाहाकार माजला. बरे या रोगाचा उद्भव नैसर्गिक जीवाणूमुळे नाही तर कृत्रिम विषाणूमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावर औषधोपचार काय करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. या विषाणूंचा प्रसार सुरुवातीला हवेतून होत नव्हता, तर स्पर्शातून होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जनसंपर्क टाळणे, एकमेकांपासून दूर राहणे आणि कोणत्याही बाहेरील वस्तूला स्पर्श न करणे आवश्यक होऊन बसले. परिणामी होता होईतो लोकांनी घराबाहेर न पडणे आवश्यक होऊन बसले. लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी सरकारी पातळीवर टाळेबंदी घोषित करणे भाग पडले. पण त्यामुळे गरीब आणि ज्यांचे पोट रोजच्या आवकीवरच अवलंबून होते अशा लोकांची पंचाईत झाली. घराबाहेर पडून कामधंदा केला नाही तर खाणार काय? ही समस्या उद्भवली. अश्या परिस्थितीत गरीब लोकांना घराबाहेर पडणे अनिवार्य होऊन टाळेबंदी शंभर टक्के यशस्वी होऊ न शकल्याने काही लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ लागला. त्यामुळे करोनाचा प्रसार पूर्णपणे रोखणे अशक्य होऊन बसले. परिणामी, आपल्या देशात करोनाचा प्रसार होतच राहिला. जगात अनेक देशातसुद्धा लोकांनी टाळेबंदी गांभीर्याने न घेतल्याने तेथे मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रसार होऊन अपरिमित मनुष्यहानी झाली. पण आपल्या देशात बहुतांश लोकांनी टाळेबंदीला प्रतिसाद दिल्याने आपल्या देशांतील आवाढव्य लोकसंख्येचा विचार करता जास्त लोकांपर्यंत करोनाचा प्रादुर्भाव पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे आपल्या देशात जगाच्या तुलनेत मनुष्यहानीचे प्रमाण खूपच कमी होते ही जमेची बाजू म्हणावी लागेल. २०१७ …
Read more